Testimonies

Mobirise

डॉ . विकास नातू
बालरोगतज्ज्ञ
विश्वस्त: डॉ . तात्यासाहेब नातू प्रतिष्ठान

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील वाडीवस्तीवरील लोकांना इतर समाज व विकासाच्या प्रवाह पातळीत आणण्यासाठी अत्यंत संवदेनशील वृत्ती व निरलस पणे काम करणारी संस्था म्हणून दिशांतर संस्थेची ओळख आहे. वस्तीविकासात त्यांनी निरबाडे खिंडवाडीतील वनवासी बांधवांकरिता केलेलं सर्वांगीण काम पाहण्याजोगं आहे पाच डोंगरपार वसलेल्या आणि पायाभूत सेवासुविधांपासून कोसो दूर असलेल्या कळकवणे खलिफावाडी या नावाने बसलेल्या धनगर समाज बांधवांच्या वस्तीचे आता दिशांतर होत आहे. शिक्षणात ज्ञानयज्ञ प्रकल्पाच्या माध्यमातून देशाच्या भावी पिढीसाठी पूर्ण विचाराअंती धोरणनिश्चिती करून दप्तरासह शैक्षणिक साहित्य वितरण , कनिष्ठ महाविद्यालयातून मोफत पुस्तकपेढी तसेच उच्चशिक्षणासाठी युवा पिढीला शिष्यवृत्ती अशा त्रिसूत्री ने प्रभावी काम सुरु आहे . अन्नसुरक्षितता आणि विषमुक्त्त अन्न … या विचाराने शेतकर्यांसाठी एकरूप झालेला अन्नपूर्णा प्रकल्प कोकण साठी अनमोल म्हणावा लागेल . शेती आतबट्याची, शेती आता परवडत नाही ….. असा सूर गत दोन दशकात अधिक जोर धरू लागला नि दिवसेंदिवस पिकाखालचं क्षेत्र झपाट्यानं आक्रसत गेलं . अशावेळी दिशांतर ने शेतकऱ्यांना नि शेतीला सन्मान देणारा अन्नपूर्णा प्रकल्प गत ३ वर्ष अक्षरशः क्रांती करणारा ठरला आहे. अनेक महिला शेती गटांनी त्यातून केवळ रब्बी हंगामातच लक्षावधी ची उलाढाल केली आहे. तुकड्या तुकड्या च्या शेतीवर सहकारातून शेती ,सामुदायिक शेती , महिलांनी केलेली शेती , सेंद्रियशेती व शेतकऱ्यांनीच पिकवायचं नि शेतकऱ्यांनीच विकायचं अशी दलालमुक्त विक्री व्यवस्थेतूनशेतीची पंचसूत्री त्यांनी उभारलीय . अनेक गावातून हे काम सुरु आहे. बी भातशेतीत भाजावनमुक्त नांगरणीमुक्त शेती यासह हळद , मशरूम , कडधान्य यासह मसाला पिकातून शेतीत अक्षरशः सोन पिकवण्याचं काम शेतकरी करूलागले आहेत. विशेष म्हणजे यात महिलांनी शेतीत केलेलं अन्नपूर्णा प्रकल्पाचं काम इतरजनांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे दिशांतर संस्थेचे हे उपक्रम वा प्रकल्प प्रत्यक्ष जाऊन बघितल्याने आम्हां साऱ्यांनी हि अनुभूती आली आहे. आता एवढ्याने समाधानी न होता राष्ट्रविकास व राष्ट्रउभारणीतलं आपलं योगदान अधिक प्रभावी पणे होण्यासाठी दिशांतर कडून आम्हां साऱ्यांना अपॆक्षा आहेत. त्यासाठी दिशांतर ला शुभेच्छा .

Mobirise
Mr. S. R. Deshmukh
Senior Manager (HR & Admn.)
Kansai Nerolac Paints Ltd.

I know Dishantar Sanstha since more than last 7 years. Sanstha has been doing amazing work for the cause of underprivileged community from Rural area of Ratnagiri district in Maharashtra state. This Sanstha is extremely committed and passionate for its social contribution. I am sure they must be making difference in the living of vulnerable section of the society. I am really glad and happy to be associated with Dishantar personally as well as through our organization’s projects named “Adishakti” and “Annapurna” taken up along with this Sanstha. They truly deserve the support and encouragement from the world of philanthropy. Moreover, I am pleased to note that the entire amount of donation is being utilized for the right cause and absolutely for the deserved beneficiary. I wish all the best to Dishantar and its office bearers.

Mobirise

सीमरन वेलवलकर
बी . एस . सी हॉस्पिटॅलीटी.

   दिशांतर. नावाप्रमाणेच दिशांतर करणारी संस्था . मी सहा वर्षांपूर्वी ज्ञानयज्ञ प्रकल्पाच्या माध्यमातून या संस्थेच्या संपर्कात आले . आज मी जे काही आहे ते या संस्थेमुळे आहे . मी बारावीत असताना पुढे बी . एस . सी . हॉस्पिटॅलिटी करण्याचा निर्णय घेतला होता परंतु , घराची परिस्थिती बेताची आणि शिक्षणाचा खर्च मोठा अशा अडचणीत सापडले होते . अशा परिस्थितीत या संस्थेने मला ज्ञानयज्ञ शिष्यवृत्ती देऊ केली. शिष्यवृत्ती देताना माझ्या घरच्या परिस्थीचा प्रत्यक्ष आढावा , माझ्या कॉलेजातील शिक्षकांशी संपर्क आणि माझी व माझ्या व्यक्तिगत मुलाखत घेऊन संस्थेने मला हि शिष्यवृत्ती देऊ केली .
आजच्या जगात निस्वार्थ भावनेने सामाजिक काम करणारे संस्थेचे अध्यक्ष राजेश सर आणि सचिव सीमा मॅडम ज्ञानयज्ञ प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या देशाची भावी पिढी घडवत आहेत . निव्वळ आर्थिक सहकार्य तर ममत्वाचा आधार आणि शिस्तीचं पालकत्वही विद्यार्थ्यांना देऊ करत आहेत. खऱ्या अर्थाने ते शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांचे पालकत्व निभावत आहेत . आज मी ही दिशांतर संस्थेच्या ज्ञानयज्ञ प्रकल्पातला माझा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतेय. संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होवो आणि दिशांतर टीम कडून भरीव सामाजिक योगदान वेगवेगळ्या प्रकल्पलातून सुरु राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .

Mobirise
वृंदावन पवार
डिप्लोमा इन इलेकट्रीकल इंजिनिअरींग
डिप्लोमा ट्रेनी इंजिनियर – के . एस . बी . लिमीटेड , पुणे .

शिक्षण हि कसरत नव्हे पण, घरच्या विपरीत परिस्थितीमुळे ते तसं बनलेलं. वडिलांचे आजारपण आणि कुटुंब चालवताना आई ची चाललेली ससेहोलपट. आई च्या संस्कारामुळे शिक्षणाचे महत्व उमजून आले होतेच. इंजिअरिंग साठी प्रवेश मिळणं शक्य होत पण, आर्थिक परिस्थिती आडवी आली. अशावेळी खेड तालुक्यातील कुळवंडी येथील राजश्री पेवेकर या ताई कडून दिशांतर संस्थेच्या ज्ञानयज्ञ शिष्यवृत्तीबाबत समजले. ती स्वतः मोठ्या जिकीरीने शिक्षण घेत असताना पुस्तकपेढी उपक्रमातून ती दिशांतर संस्थेच्या उपक्रमाशी जोडली गेली होती. विशेष म्हणजे शिष्यवृत्ती करीता पात्र ठरली असताना प्राधान्याने वृंदावन याला सहकार्याची गरज असल्याचे तिने सांगितले. संस्थेने होम व्हिजिट करत आम्हा दोघांना शिष्यवृत्ती देऊ केली. याच साऱ्यामुळे आज शिक्षण घेऊन आम्ही नोकरीतून कुटुंब चालवीत आहोत. गरजेवेळी मिळालेला सहकार्याचा एक संवेदनशील हात सारं जीवन पालटून टाकतो, त्याचीच तर प्रचिती येत आहे ….